जेएनएन, ठाणे. Kalyan Fire News: कल्याण झुलेलाल चौकातील रिव्हरडेल इमारतीच्या 13 आणि 14 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे आधिकारी दाखल झाले असून त्यांनी दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
आगीने रौद्ररूप धारण केलं
कल्याण झुलेलाल चौकातील रिव्हरडेल इमारतीच्या 14 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागल्याची घटना घडली आहे. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केलं. आगीमुळे इमारतीमधील राहिवाशांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते. आग मोठी असल्यामुळे रहिवाशांनी इमारतीखाली धाव घेतली.
दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण
अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहेत.
हेही वाचा - NAFED सोयाबीन खरेदीकेंद्रावर शेतकऱ्यांची लूट! नाना पटोलेंची कंपनीवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
या इमारतीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती नागरिकांनी दिली असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आगीचे कारण आम्ही शोधत आहोत, असं त्यांनी सांगितलं. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी नाही या घटनेत झालेली नाही, मात्र फ्लॅटचे नुकसान झाले आहे, असं त्यांनी सांगितलं.