जेएनएन, मुंबई. Protest against Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा अशी मागणी करत आज आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या  कडून हा धडक मोर्चा विधानभवन वर काढण्यात आला आहे.

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी

शक्तीपीठ महामार्ग बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी हा मोर्चा काढण्यात आले आहे. यावेळी नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत शक्तिपीठ महामार्ग रद्द करावी अशी मागणी केली आहे. मोर्चासाठी आझाद मैदानवर विधिमंडळ विधान सभानेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, विश्वाजीत कदम, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी उपस्थित होते.

हे सरकारच षडयंत्र 

राज्यात सत्तेत असणाऱ्या लोकांना कोल्हापूरची मोठी धास्ती होती, म्हणून कोल्हापूरपूर्ता महामार्ग रद्दचा निर्णय सत्तेतील काही मंत्र्यांनी जाहीर केला. मात्र याला कायदेशीर आधार नाही. सरकारमध्ये राहायचं आणि त्यांच्याच मंत्र्यांनी आणि आमदारांनी वेगवेगळी स्टेटमेंट करायचं, हे सरकारच षडयंत्र असल्याची टीकाही आमदार सतेज पाटील यांनी केली.

हेही वाचा - Mumbai News: लीलावती रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांनी केला 1500 कोटींचा घोटाळा? काळी जादू आणि तंत्र-मंत्राचा प्रकार उघडकीस; FIR दाखल

    ही लढाई रस्त्यावर करणार

    गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्या असताना सुद्धा शक्तीपीठ का लादला जात आहे. 86 हजार कोटीचा हा प्रकल्प असल्याचं सांगण्यात येत आहे. एवढी मोठी रक्कम पाहता एका किलोमीटरला, 110 कोटींचा खर्च येणार आहे. शक्तिपीठ मध्ये कोण फित्तुर होऊ नये, यासाठी काळजी घेऊया. न्यायालयात जाण्याऐवजी ही लढाई रस्त्यावर करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.