जेएनएन, पुणे. Pune-Nashik highway :  पुणे - नाशिक अंतर आता अगदीच जवळ येणार आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील उन्नत मार्गिका (Elevated Corridor) आणि पुणे रिंगरोड प्रकल्प या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे दोन महत्त्वाचे औद्योगिक जिल्हे असणारे पुणे आणि नाशिक यांच्यातील अंतर कमी होणार आहे. दरम्यान प्रवासाचा वेळ खूपच कमी होणार आहे.

अशी आहे पुणे-नाशिक महामार्गावरील उन्नत मार्गिका!

  • लांबी : 28 किमी
  • मार्ग : नाशिक फाटा – राजगुरुनगर (खेड)
  • सध्याचा प्रवास वेळ : 1.5 ते 2 तास
  • नवीन प्रवास वेळ : फक्त 20 मिनिट अपेक्षित

या उन्नत मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून, चाकण शहरातील प्रचंड वाहतूक कोंडीही सुटणार आहे. चाकण एमआयडीसी परिसरात मालवाहतुकीला वेग मिळणार आहे.

खालील ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया सुरू -

  • नाणेकरवाडी
  • मेदनकरवाडी
  • वाकी खुर्द
  • वाकी बुद्रुक
  • चिंबळी
  • कुरुळी
  • चाकण

तसेच चाकण शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेदनकरवाडी, कडाची वाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी या गावांमध्ये पर्यायी बाह्य वळण रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे.

    पुणे रिंगरोड प्रकल्प -

    • लांबी : 264 किमी
    • रुंदी : 6-लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग
    • पहिला टप्पा : नाशिक महामार्ग – अहिल्यानगर मार्ग
    • दुसरा टप्पा : अहिल्यानगर महामार्ग – सोलापूर महामार्ग
    • तिसरा टप्पा : सोलापूर रस्ता – सातारा रस्ता
    • चौथा टप्पा : सातारा रस्ता – पौड रस्ता असणार आहे.