एजन्सी, जालना. Jalna Latest News: जालना जिल्ह्यात जामवाडी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं गायीचे दूध काढत असताना तिने लाथ मारल्यानं एकानं गायीची हत्या केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कुदळ उचलून गायीच्या डोक्यावर मारले

जामवाडी गावातील रहिवासी असलेला हा माणूस मंगळवारी गायीचे दूध काढण्याचा प्रयत्न करत असताना गायीने त्याला लाथ मारली. त्यानंतर त्याने कुदळ उचलून गायीच्या डोक्यावर मारले, ज्यामुळे तिचा तडफडून मृत्यू झाला, असे तहसील पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.

घटनेची माहिती मिळताच, काही गोरक्षक गटांचे सदस्य आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी गेले, असे पोलिसांनी सांगितले.

गुन्हा दाखल

    बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 325 (प्राण्याला मारणे, विष देणे, अपंग करणे किंवा निरुपयोगी करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.