जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. 93.25 टक्के मुली उत्तिर्ण झाल्या आहेत. तर यंदा 89.79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मंडळाने बारावीच्या मार्कशीटमध्ये 3 मोठे बदल केले आहेत.
14 लाख 33 हजार विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा
बारावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातून राज्यभरातून 14 लाख 33 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 89.79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा 157870 विद्यार्थी नापास झाले आहेत.
लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल
राज्याच्या नऊ विभागांपैकी लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. 84.14 टक्के इतका हा निकाल आहे. मागच्या वर्षीही लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल होता.
मार्कशीटमध्ये मोठे बदल
बारावीच्या परीक्षेत मार्कशीटमध्ये यंदा मोठे बदल करण्यात येणार आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली आहे.
आता मार्कशीटवर जुन्या पद्धतीनुसार आधी आडनाव येणार नाही. आधार कार्ड किंवा ‘अपार’ (APAAR) आयडीवरील नोंदीनुसार, आधी विद्यार्थ्याचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा क्रमाने नाव छापले जाईल.
तसेच सुरक्षेच्या दृष्टीने गुणपत्रिकेवर विद्यार्थ्याचा फोटो आणि एक विशिष्ट क्यूआर कोड असेल, ज्यामुळे निकालाची पडताळणी करणे सोपे होईल.
Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीचा विभागनिहाय निकाल
| Division | Registered | Passed | Percentage (%) |
| PUNE | 244,191 | 220,680 | 91.25 |
| NAGPUR | 153,256 | 134,988 | 88.67 |
| C. SAMBHAJINAGAR | 184,841 | 162,022 | 88.68 |
| MUMBAI | 324,739 | 291,415 | 90.08 |
| KOLHAPUR | 111,482 | 99,398 | 89.97 |
| AMRAVATI | 148,931 | 134,352 | 90.92 |
| NASIK | 162,914 | 146,799 | 90.72 |
| LATUR | 91,326 | 75,641 | 84.14 |
| KONKAN | 23,033 | 21,548 | 94.14 |
| TOTAL | 1,444,713 | 1,286,843 | 89.79 |
