जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे इ.12 वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 च्या निकालाबाबत एक निवेदन दिले आहे. त्यानुसार यंदा बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result 2026) अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.
यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल
बारावीच्या (HSC) निकालात यंदाही कोकण विभाग आणि राज्यातून मुलींनी बाजी मारली आहे. कोकणाचा निकाल सर्वाधिक 94.14 टक्के इतका लागला आहे. अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे.
HSC 12th Result 2026: DigiLocker द्वारे निकाल कसा तपासावा
- DigiLocker वरून तुमचा निकाल डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला (website) भेट द्या: www.digilocker.gov.in.
- आता, संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर (homepage) असलेल्या 'VIEW RESULT' या विभागावर क्लिक करा.
- त्यानंतर, 'Maharashtra Board 12th Result 2026' या दुव्यावर (link) क्लिक करा.
- दुव्यावर क्लिक केल्यानंतर, विचारलेली आवश्यक माहिती भरा.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर, तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
12th Passing Mark: बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती टक्के गुण आवश्यक?
- बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण 35 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेडदेखील मिळतील.
- ग्रेडिंग सिस्टीमनुसार 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे.
- 60 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी मिळेल.
- 5 टक्के ते 59 टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल.
- उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना 35 पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे.
ऑनलाइन बारावीची मार्कशीट कशी डाउनलोड कराल? (How to download your 12th-grade marksheet online?)
- विद्यार्थी त्यांचा निकाल आणि मार्कशीट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळांवरून पाहू शकतात.
- पहिल्यांदा वरील वेबसाइट उघडा.
- ‘HSC Examination March 2026 Result’ या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
- ‘View Result’ किंवा ‘निकाल पहा’ या बटणावर क्लिक करा.
- स्क्रीनवर तुमची ऑनलाइन गुणपत्रिका दिसेल.
- ती डाउनलोड करून प्रिंटआउट घ्या.
