जेएनएन, पुणे, Pune Liquor Ban: गणेशोत्सव (Ganesh Utsav 2025) मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यात दारू विक्री पूर्णपणे बंद (Pune Liquor Ban) ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

असा आहे आदेश 

गणेशोत्सव काळात पुणे शहर आणि ग्रामीण भागात कायदा–सुव्यवस्था नियंत्रित राहावी यासाठी हा बंदीचा निर्णय  घेण्यात आला आहे.

या कालावधीत परवाना असलेली दारूची दुकाने, बार, वाईन शॉप्स आणि परवानाधारक विक्री केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

दरम्यान आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या अधिकारीने दिली आहे.

पुण्यात गणेशोत्सवाची धूम

    पुण्यात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. बाजार हे गणेशोत्सवाच्या साहित्यांनी फुलले आहेत. नागरिकांची गणेश मुर्ती आणि गणेश उत्सवाचे साहित्य खरेदी साठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

    जिल्हाधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतला?

    27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर तारखेपर्यंत खडक, विश्रामबाग फारसखाना या पोलीस स्टेशन हद्दीतील सगळी दारू विक्र राहणार बंद राहणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. तर गणपती आगमन आणि विसर्जन दिवशी पुणे जिल्ह्यात पूर्ण दारू बंदी असणार आहे. 5 व्या आणि 7 व्या दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावरदेखील दुकान बंद राहणार आहेत.

    गणेश चतुर्थी तिथी कधी? (When is Ganesh Chaturthi)

    मराठी पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट दुपारी 01:54 वाजेपासून 27 ऑगस्टला दुपारी 03:44 वाजेपर्यंत आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरी होणार आहे. स्थापनेचा मुहूर्त: सकाळी 11:23 ते दुपारी 01:54 (अवधिः 2 तास 31 मिनिटे)