जेएनएन, पुणे: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला (Pune Graduate constituency election) अजून एक वर्षाचा कालावधी असला तरी, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत उमेदवाराच्या नावावरून मतभेद दिसत आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे.

चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

“पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड हेच महायुतीचे उमेदवार असतील.” या वक्तव्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि घटकपक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांनी “अजून उमेदवारीवर चर्चा झालेली नाही, मग पाटीलांनी घोषणा कशी केली?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

महायुतीत अंतर्गत नाराजी

भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांमध्ये उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, पाटीलांच्या या वक्तव्याने इतर घटक पक्षांत नाराजी व्यक्त केली जात आहे. 

अजित पवार गटाचा दावा

    या मतदार संघावर अजित पवार गटाने दावा केला आहे. तर शिवसेना शिंदे गटाने मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये काहीजण अरुण लाड यांच्या कुटुंबातील व्यक्तीऐवजी पक्षातील जुन्या कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी मागणी करत आहेत.