जेएनएन, अक्कलकोट: स्वामी समर्थ महाराजांच्या (Swami Samarth Maharaj) भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळी सुट्ट्यांच्या काळात वाढत्या भाविकांच्या गर्दीचा विचार करून अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीने मंदिर 20 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 16 ऑक्टोबरपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा विशेष निर्णय लागू राहणार असून, भक्तांना दर्शन सुलभतेने मिळावे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. 

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचा निर्णय

अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान असून, देशभरातून हजारो भाविक दररोज येथे दर्शनासाठी येतात. दिवाळी सुट्ट्यांच्या काळात या संख्येत मोठी वाढ होत असल्याने, मंदिर प्रशासनाने विशेष वेळ निश्चित केली आहे.

दर्शनाचा कालावधी

16 ऑक्टोबर ते त्रिपुरारी पौर्णिमा 

मंदिर पहाटे 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत एकूण 20 तास खुले राहणार आहे. या काळात नियमित पूजाअर्चा, अभिषेक, आरती आणि धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे.