जेएनएन, मुंबई. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिस हद्दीत झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. नंदुरबारमधील (Nandurbar Accident News) चांदशाली घाटावर वाहन कोसळल्याने हा अपघात झाला. इतर आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती नंदुरबार पोलिसांनी दिली आहे.

अपघातात 8 जणांचा मृत्यू

नंदुरबारच्या चांदशैली घाटात एका खासगी वाहनाला झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला, तर 28 जण जखमी झाले आहेत. यापैकी 15 जणांची प्रकृती गंभीर आहे. अस्तंबा यात्रेहून परतत असताना हा अपघात झाला.

पिकअप व्हॅन घाटात कोसळले

चांदशैली घाटातून पिकअप गाडी जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झाला. पिकअप व्हॅन घाटात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. त्यामुळे वाहनाच्या मागच्या भागात बसलेले लोक खाली दबले गेले. अनेकांना जबर मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    पोलीस बचाकार्यासाठी घटनास्थळी आले, तेव्हा येथील दृश्य भयावह होते. अनेक लोक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. सध्या या सर्वांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे. दरम्यान दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.