पुणे. PMC Election 2026 : पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठं यश मिळालं आहे. सरपंच, उपसरपंचांसह तब्बल 58 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकाचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही, असं स्पष्ट जाहीर केल्यानंतर राजकीय समीकरणांमध्ये हालचाली वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत असून, संघटन बळकटीकरणावर त्यांनी भर दिला आहे.

गावपातळीवर मोठा धक्का-

माहितीनुसार, प्रवेश करणाऱ्यांमध्ये विविध गावांतील विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रभावी स्थानिक नेते यांचा समावेश आहे. या सर्वांनी एकत्र येत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने विरोधी पक्षांना हा मोठा धक्का मानला जात आहे. ग्रामीण भागात थेट जनसंपर्क असलेल्या नेत्यांचा प्रवेश झाल्याने, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये अजित पवार गटाला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

अजित पवारांचा स्पष्ट संदेश!

प्रवेश कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी, “काम करणाऱ्यांना पक्षात योग्य संधी दिली जाईल. विकास हाच आमचा अजेंडा आहे.” असा स्पष्ट संदेश दिला. तसेच पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, शेती, पाणीपुरवठा आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर राष्ट्रवादीची भूमिका ठाम असल्याचे नमूद केले आहे .

    पुणे-पिंपरीत राजकीय हालचालींना वेग!

    भाजप-राष्ट्रवादी युतीबाबत पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी वेगळं चित्र स्पष्ट झाल्यानंतर, अनेक स्थानिक नेते आपली पुढील राजकीय दिशा ठरवत असल्याचं दिसत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीत होत असलेले प्रवेश अजित पवारांसाठी ‘जॅकपॉट’ ठरत आहे.

    आगामी निवडणुकांवर परिणाम?

    या सामूहिक प्रवेशामुळे—

    • राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद वाढली

    • ग्रामीण भागात पकड मजबूत झाली

    • आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं