जेएनएन, शिर्डी: शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्तांना प्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडूच्या किंमत वाढवली आहे. मंदिर प्रशासनाने लाडूच्या दरात तब्बल 10 रुपयांची वाढ केली असल्याने यामुळे अनेक भाविक नाराज झाले आहेत.
कशामुळे वाढली किंमत!
आतापर्यंत 20 रुपयांना मिळणारे लाडूचं पाकीट आता थेट30 रुपयांना मिळणार आहे. साईबाबा संस्थानने हा निर्णय वाढत्या साखर, तूप आणि इतर कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाले असल्याने घेतल्याचं सांगितले आहे.
आर्थिक ताळमेळसाठी दरवाढ!
दरवाढीमुळे प्रसाद निर्मितीच्या खर्चाचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे साईबाबा प्रशासनाने सांगितले आहे.
दरवाढमुळे भक्त नाराज!
साईबाबांचा लाडू प्रसाद महाग झाल्यामुळे गरिब आणि मध्यमवर्गीय भक्तांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे यामुळे भाविकात नाराजीचा सूर दिसत आहे.
साई बाबांच्या प्रसादाला व्यावसायिक स्वरूप दिले जात आहे अशा शब्दांत अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.