जेएनएन, नाशिक. Nashik Kumbh 2027 Date: प्रयागराज मधील कुंभमेळा पार पडल्यानंतर नाशिकमध्ये कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. कुंभमेळाची तयारीसाठी राज्य सरकार कडून अनेक आढावा बैठका पार पडत आहेत. दरम्यान कुंभमेळ्याची नामकरणावरुन मोठा वाद सुरू झाला आहे. पहिलं नाव कुणाचं यावरुन महंतांमध्ये जुंपली आहे.

महंतांमध्ये तीव्र मतभेद 

नाशिकच्या कुंभमेळा सुरू होण्या आदीच नामकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. त्र्यंबकेश्वरचे नाव द्यायचे की नाशिकचे महाकुंभाला नाव द्यायचे यावरुन महंतांमध्ये चांगलीच जुंपली आहे. तर शाहीस्नानाचा पहिला मान कुणाचा पहिला अधिकार कुणाचा यावरुनही महंतांमध्ये तीव्र मतभेद दिसत आहे.

पहिले शाहीस्नान कोण करणार यावरुन वाद 

2027 मध्ये राज्यातील नाशिक जिल्ह्यात महाकुंभ होणार आहे. राज्य सरकारकडून महाकुंभाची जोरदार तयारी सुरु आहे. कुंभची तयारी सुरू असतानाच नामकरण आणि शाहीस्नान वरुन साधुसंतांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. नाशिकच्या कुंभात पहिले शाहीस्नान कोण करणार यावरुन वाद निर्माण झाला आहे.

    पेशव्यांच्या काळात त्र्यंबकेश्वरला शैव तर नाशिकच्या रामकुंडात वैष्णव शाही स्नान करतात असा निवाडा झाला होता. पण प्रयागराजला राष्ट्रीय आखाडा बरखास्त झाल्यानंतर शाहीस्नान कोण करणार यावर अजूनही निर्णय झाला नाही, असा दावा अनेक महंतांनी केला आहे.

    नामकरणावरुन महंतांमध्ये जोरदार वाद

    तर दुसरीकडे  कुंभमेळ्याच्या नामकरणावरुनही जोरदार वाद निर्माण झाला आहे. त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा असे  म्हणायचे की नाशिक-त्र्यंबकेश्वर म्हणायचे यावरुनही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या महंतांमध्ये जोरदार वाद दिसत आहे. 

    महंत सुधीरदास पुजारी आणि अनिकेत शास्त्री देशपांडे हे साधू महंत नाहीत असा आरोप ही मंहंत शंकरानंद सरस्वतींनी केला आहे. हा वाद मिटवण्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनी नाशिकला भेट दिली. आखाडा परिषदेनी महंतांमधील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नाशिक कुंभचा वाद कधी मिटणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.