जेएनएन, जळगाव. Jalgaon Latest News: वरणगाव तालुका भुसावळ येथील जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर हे अरुणाचल प्रदेशमध्ये ड्युटीवर असतांना 24 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने शहीद झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
शासकिय इतमामात अंत्यसंस्कार
त्यांच्या पार्थिवावर आज 27 मार्च रोजी वरणगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
हृदयविकाराचा झटका आला अन्
शहीद जवान अर्जुन बावस्कर हे भारतीय लष्करात 15 वर्षापासून सेवा बजावत होते. ते अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले होते.
हेही वाचा - Maharashtra ST Bus News: एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी गूडन्यूज, 15 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात…

अखेरचा निरोप
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, नामदार गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे यांनी घटनास्थळी भेट दिल्या. यावेळी सैनिकाकडून मानवंदना देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पण करून व बंदुकीच्या फेरी झाडून शहीद अर्जुन यास अखेरचा निरोप देण्यात आला आहे.