जेएनएन, अहिल्यानगर. Ahilyanagar Latest News: जम्मू काश्मीरमध्ये भारत-पाक नियंत्रण रेषेवर कार्यरत असलेल्या संगमनेर तालुक्यातील जवानाचा मृत्यू झाला होता. वीर जवान रामदास साहेबराव बडे यांच्या पार्थिवावर आज संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे शासकीय ईतममात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

रामदास साहेबराव बडे यांना वीरमरण

24 मार्च रोजी जम्मू-काश्मीरमधील तंगधार जिल्ह्यात कर्तव्यावर असताना पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार झाला. यावेळी भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. या गोळीबारात जखमी झालेले भारतीय लष्करात हवालदार पदावर कार्यरत असलेले संगमनेर तालुक्यातील मेंढवनचे रामदास साहेबराव बडे यांना वीरमरण आलं. या बातमीनं पंचकृशीतील नागरिकांत शोकलहर पसरली होती.  त्यांच्यावर आज त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.