जेएनएन, नाशिक: मालेगाव शहरात 29 सप्टेंबर 2028 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा (Malegaon Blast Case Verdict) निकाल NIA कोर्टाने दिला आहे. विशेष एनआयए न्यायालय साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सात आरोपीना या प्रकरणात पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे. 17 वर्षांनंतर येणाऱ्या या निकालाची सर्वांनाचे लक्ष लागले होते. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते.
#WATCH NIA कोर्ट ने मालेगांव विस्फोट मामले में साध्वी प्रज्ञा सिंह, लेफ्टिनेंट कर्नल पुरोहित और अन्य सभी आरोपियों को बरी कर दिया। आरोपियों को UAPA, आर्म्स एक्ट और अन्य सभी आरोपों से बरी कर दिया गया है।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 31, 2025
(वीडियो अदालत के बाहर से है) pic.twitter.com/bk9jUHgFZ1
साध्वी प्रज्ञा सिंहसह सर्व आरोपी निर्दोष मुक्त
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञा सिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि इतर सर्व आरोपींना एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आरोपींना यूएपीए, शस्त्रास्त्र कायदा आणि इतर सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
स्फोटात 6 जणांचा मृत्यू
29 सप्टेंबर 2008 रोजी लोक रमजान महिना आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यात व्यस्त होते. रात्री 9:35 वाजता मालेगावमधील भिखू चौकात बॉम्बस्फोट झाला. सर्वत्र धूर आणि लोकांचे ओरडणे ऐकू येत होते. यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. 100 हून अधिक लोक जखमी झाले होते.
या प्रकरणातील आरोपी
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (निवृत्त), मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), समीर कुलकर्णी, अजय राहीकर, सुधाकर धर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे आणि सुधाकर चतुर्वेदी हे या प्रकरणात आरोपी होते. त्यावर आज न्यायालयाने दिला आहे.
एनआयएच्या आधी या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (ATS) ने केला होता. त्यानंतर 2011 मध्ये हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) वर्ग करण्यात आले. तपासादरम्यान काही आरोपींवरच्या UAPA (दहशतवादविरोधी कायदा) अंतर्गत असलेल्या आरोपातून सुटका झाली, तर काही गंभीर आरोप कायम ठेवण्यात आले होते. यावर आज न्यायालयाने निर्णय देत सर्व आरोपींना न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त केल आहे.