जेएनएन, नागपूर: नागपूरच्या महाल परिसरात घडलेली धार्मिक दंगली संदर्भात तपास करणाऱ्या तज्ज्ञ समितीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. या दंगली सहज किंवा अचानक घडलेल्या नसून त्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा ठोस निष्कर्ष समितीने काढला आहे.
समितीच्या अहवालातील प्रमुख मुद्दे!
- या दंगलीमागे धर्मीय तेढ पसरवण्याचे योजनाबद्ध प्रयत्न झाले.
- काही ठिकाणी सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती व अफवा पसरवून वातावरण तापवण्यात आले.
- स्थानिक पोलिस प्रशासनाने सुरुवातीच्या टप्प्यावर वेळीच कारवाई न केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
- काही राजकीय घटकांकडून परिस्थिती चिघळवण्यासाठी मुलभूत प्रश्नांऐवजी धार्मिक भावना भडकवणारे विधान करण्यात आले.
- दंगलीत संपत्तीची नासधूस, जाळपोळ आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला.
समितीने 11 शिफारशी केले
- मुस्लीम समाजाच्या तरुणांना समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्याची गरज.
- सोशल मीडियावर निगराणी वाढवणे आणि चुकीच्या पोस्ट/फॉरवर्डवर त्वरीत कारवाई करणे.
- पोलिस दलात संवेदनशीलतेचे प्रशिक्षण देणे.
- दंगलग्रस्त भागातील सर्वेक्षण व सामाजिक संवाद वाढवणे.
- स्थानिक धर्मगुरु व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तणाव कमी करणे.
- अशांतता घडवून आणणाऱ्यांची त्वरित ओळख व कठोर कारवाई.
- पीडितांना त्वरित मदत व नुकसानभरपाई.
- स्थानिक प्रशासकीय यंत्रणांची जवाबदेही निश्चित करणे.
- शाळा‑महाविद्यालयांमध्ये सद्भावना व राष्ट्रीय एकात्मतेचे कार्यक्रम.
- सतत सामाजिक संवाद मंच स्थापन करणे.
- भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी विशेष दंगा नियंत्रण पथके तैनात करणे सारख्या प्रमुख शिफारसी समितीने केले आहे.
हेही वाचा - संतोष देशमुख, महादेव मुंडे हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा - सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी
