नाशिक. Ashok Kharat Case : नाशिकच्या सिन्नरमधून एक खळबळजनक व समाजमन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. येथे 67 वर्षाचा ज्योतिषी अशोक खरात याला अध्यात्म आणि पूजा-विधीच्या नावावर एका महिलेसोबत अनेक वेळा बलात्कार केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली. मर्चेंट नेव्हीमधून रिटायर्ड झालेला हा खरात आपल्या अनुयायांमध्ये ‘कॅप्टन’ नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे दिल्लीपासून राज्यातील अनेक बड्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. आरोपी खरातला बुधवारी पहाटे त्याच्या निवासस्थानातून अटक केली.

महिलांना कसे ओढायचा जाळ्यात?

पोलीस एफआयआरनुसार खरात महिलांच्या त्यांच्या घरगुती समस्या सोडवण्याच्या बहाण्याने आपल्या कार्यालयात बोलावत असे. पूजा-विधीच्या नावावर त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांना संमोहित म्हणजेच हिप्नोटाइज करत असे. आरपी महिलांची आस्था आणि भीतीचा फायदा घेत असे. तो त्यांच्या पतीच्या जीवाला धोका असल्याचे सांगून महिलांशी शरीर संबंध ठेवत असे. 

अशोक खरातचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो समोर आले असून यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. हे प्रकरण चांगलंच तापलं असून राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. काल 58 व्हिडिओ सापडल्यानंतर पोलिसांना आज आणखी काही अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. याप्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे सोपवण्यात आला असून पुणे येथील एसआरपीएफच्या बल गट क्र. एकच्या समादेशक (आयपीएस) तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र याचा लिंगपिसाटपणा कसा बाहेर आला ? याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

अशोक खरातचा काळा कारनामा कसा बाहेर आला?

    सिन्नरमधील कॅनडा कॉर्नर परिसरात अशोक खरात याने कार्यालय थाटले असून अनेक महिलांना त्यांच्या समस्या सोडवण्याच्या बहाण्याने येथे बोलावत असे व त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय आहे. हे प्रकरण बाहेर काढण्यात अशोक खरात याच्या मर्जीतील ऑफिस बॉय संशयित नीरज जाधव याचा हात असल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबर 2025 मध्ये नीरज याने अशोक खरात याच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले, ज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना कैद आहेत. 

    जाधवकडून खंडणीची मागणी -

    अनेक उच्चभ्रू व गरीब महिलांवर अत्याचार करणारा अशोक खरात समाजात ‘संत’ म्हणून वावरत होता, मात्र त्याचे काळे कारनामे असलेले व्हिडिओ पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली. त्याने अत्याचाराचे ते व्हिडिओ खरातला पाठवून पैशासाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नीरज आणि त्याच्या काही साथीदारांनी खरातकडे तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणीही मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र अशोक खरातने याला केराची टोपली दाखवली व काय करायचे ते कर म्हणाला.

    व्हिडिओ पीडित महिलांनाच पाठवला -

    खरात दादा देत नसल्याचे पाहून नीरज जाधवने या क्लिप पीडित महिलांनाच पाठवयाला सुरूवात केली. शिर्डीतील एका 24 वर्षांच्या विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ नीरजने तिच्या व्हॉट्सॲपवर पाठवून पैशासाठी धमकावले. तिने हा प्रकार खरातला सांगितला. प्रकरण वाढत जात असल्याचे पाहून खरातने महिलेला पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर असाच 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठवला. तेव्हा ती पीडिता पोलिसात गेली आणि हा संपूर्ण प्रकार जनतेसमोर आला.

    दरम्यान एका 24 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनूसार निरज जाधव विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात मागील महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र याची शिर्डी पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तक्रार दाखल करून महिला उलटला तरी नीरज पोलिसांच्या हाती लागलेला नाही.