जेएनएन, नागपूर. PM Modi on Nagpur Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर आहेत. भाजपाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

पंतप्रधानांचा नागपूर दौरा (PM Narendra Modi Nagpur Tour)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, दीक्षाभूमी त्यानंतर माधव नेत्रालय आणि डिफेन्सचे दारुगोळा निर्माण करणारी सोलार कंपनीला भेट देणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. तसंच, भाजपकडून प्रत्येक चौकात मोदीजींचे स्वागत केले जाणार आहे, असं ते म्हणाले.

आम्ही मुस्लिम विरोधी लोक नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी रमजान ईदच्या शुभेच्छा सर्व देश वासीयांना दिल्या आहेत. भाजपच्या मायनॉरिटी कमिटीने रमजानच्या निमित्ताने तो कार्यक्रम राबवला आहे. भाजपचे अनेक अल्पसंख्यांक मुस्लिम मोर्चा यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला जात आहे. आम्ही मुस्लिम विरोधी लोक नाही आहोत, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

    सर्वांना सोबत घेऊन आम्ही जातो

    भारतात राहुन पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणारे लोकांच्या विरोधात आहे. उद्धव ठाकरेंच्या नाशिक आणि परभणीच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकत होते. त्यांच्याविरोधी आमची भूमिका आहे. पाकिस्तान मॅच जिंकल्यानंतर भारतात राहून फटाके फोडणारे जे लोक आहेत, त्यांच्या विरोधात आहोत. सर्व मुस्लिम विरोधी आम्ही नाही. या देशाच रक्तच असं आहे की, सर्वांना सोबत घेऊन आम्ही जातो, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

    पक्ष वाढवावा

    उद्धव ठाकरे यांनी इतर पक्षांवर टीका करण्यापेक्षा आपला पक्ष वाढवावा, त्यांच्या पक्षातील मोठे नेते रोज दुसऱ्या पक्षात जात आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे, मागे इतिहासात काय झालं हे जनतेला माहिती आहे. आम्ही लोकसभेला हरले. त्यानंतर आम्ही जनतेत गेलो आणि जनतेनं आम्हाला पुन्हा निवडून दिलं. तसंच, तुम्ही जनतेत जा, असा सल्ला बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.