जेएनएन, मुंबई. साईभक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शिर्डीचे साईबाबांच्या मूळ चरण पादुका देशभरातील विविध राज्यांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत. साईबाबांच्या मूळ 'चरण पादुका' देशभरातील विविध शहरांमध्ये दर्शनासाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.
साईबाबांच्या मूळ 'चरण पादुका' साई भक्ताच्या दर्शनसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. देशभरातील साईभक्त लाखोंच्या संख्येने साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. मात्र, आता साक्षात साईबाबांच्या मूळ चरण पादुका देशभरातील विविध राज्यांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा - Operation Tiger: उद्धव ठाकरेंना मोठा झटका, अनेक जिल्हाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे गटात पक्षप्रवेश
या राज्यात होणार दर्शन सोहळा!
साई बाबाचे चरण पादुका पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांतील आठ शहरांमध्ये या पादुकांचा दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे. 10 एप्रिल 2025 ते 13 एप्रिल 2025 दरम्यान महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे भाविकांच्या दर्शनासाठी साईबाबांच्या मूळ चरण पादुका उपलब्ध असणार आहेत. 14 एप्रिल ते 18 एप्रिल 2025 दरम्यान कर्नाटकातील दावणगेरे आणि मल्लेश्वरम येथे पाच दिवस साईबाबांच्या मूळ चरण पादुका भाविकांसाठी दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे. 19 ते 25 एप्रिल पर्यंत तामिळनाडू राज्यातील सेलम, करूर, पुलीयमपट्टी आणि धर्मपुरी याठिकाणी साईबाबांच्या मूळ चरण पादुका भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत.26 एप्रिल 2025 रोजी धर्मपुरी याठिकाणी असलेल्या साईबाबांच्या मूळ चरण पादुका पुन्हा शिर्डीकडे रवाना होणार आहे.
हेही वाचा - Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनात 12 कायदे मंजूर, मुख्यमंत्र्यांची माहिती
2776 किलोमीटरचा प्रवास करणार चरण पादुका
साईबाबाच्या मूळ चरण पादुकांचा दौरा तब्बल 2776 किलोमीटरचा असणार आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान आणि स्थानिक आयोजन समिती यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यादरम्यान, शिर्डीतील साईबाबा संस्थानचे अधिकारी, सुरक्षारक्षक, आणि त्यासोबतच साई मंदिरातील पुजारी असे एकूण 20 कर्मचारी असणार आहे.