जेएनएन, नागपूर. Nagpur News: विश्व हिंदू परिषदेचे आठ कार्यकर्ते कोतवाली पोलिसांसमोर शरण आले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले.
पदाधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल
संभाजीनगर येथील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने करताना धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र पोलिसांनी नागपूरमधील विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केले आहेत.
#WATCH | Nagpur, Maharashtra | Eight workers of VHP and Bajrang Dal surrendered before Kotwali police. Police arrested them and produced them before the court.
— ANI (@ANI) March 19, 2025
Maharashtra police in Nagpur has registered FIRs against office-bearers of the Vishwa Hindu Parishad (VHP) and Bajrang… pic.twitter.com/1ifgl5T3io
प्रतिकात्मक कबर जाळली
शिवाजी महाराज पुतळयासमोर विश्वहिंदु परिषद, बजरंग दल, नागपूर तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाल नागपूर येथे विश्वहिंदु परिषद, बजरंग दल, नागपूरचे कार्यकर्ते एकत्रित येवून सदर ठिकाणी 200 ते 250 कार्यकर्ते जमा होउन औरंगजेब की कबर हटाव अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. त्या दरम्यान सदर ठिकाणी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देउन औरंगजेबाचा फोटो तसेच त्यामध्ये हिरव्या रंगाच्या कापडयामध्ये (गवताचा पेंडा भरून असलेली) प्रतिकात्मक कबर जाळली. मात्र, नागपुरात आंदोलनात आयाती जाळल्या अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या आणि त्यानंतर सोमवारी हिंसाचार झाला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आपल्या निवेदनात दिली आहे.
अनेक भागात कर्फ्यू
नागपुरात सध्या शांतता आहे. तर हिंसाचार प्रकरणात 50 जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारात 3 DCP सह 12 पोलिस जखमी झाले आहेत. सध्या अनेक भागात कर्फ्यू लावण्यात आलेला आहे, अशी माहिती आहे.