जेएनएन, नागपूर. Forensic Science University in Nagpur: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी नागपूर येथे न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (Forensic Science University) सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या विद्यापीठामुळे नागपूरच्या शैक्षणिक वैभवात भर पडली आहे. याचा लाभ देशभरातील फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना व कर्मचाऱ्यांना होणार आहे

हे विद्यापीठ नागपूर मध्ये होत आहे, याचा नागपूरसह महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वात भारत सर्वच पातळ्यांवर आणि विकासाच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. हे विद्यापीठ विकसित भारताच्या संकल्पात महत्वाचे योगदान देईल, हा मला विश्वास आहे, असं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

नागपूरचा पालकमंत्री या नात्याने समस्त नागपूरकरांच्या वतीने पंतप्रधान  नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्या पुढाकारामुळे हे विद्यापीठ नागपुरात सुरू होत आहे, त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार, असं त्यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे. 

महाराष्ट्राने न्यायवैद्यक विज्ञान उपक्रमांमध्ये आधीच आघाडी घेतली आहे आणि हे विद्यापीठ कॅम्पस निश्चितपणे तपास विज्ञान वाढवेल, मनुष्यबळ सुधारले आणि आपल्या देशाच्या न्यायवैद्यक क्षमतांना बळकटी देईल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानले आहेत.