जेएनएन, नागपूर. Nagpur News: नागपुरात एका 35 वर्षीय व्यक्तीने नऊ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार 

कोटवाली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना सोमवारी दुपारी घडली. मुलगा घराबाहेर मित्रांसोबत खेळत असताना आरोपीने त्याला चॉकलेटचे आमिष दाखवले, त्याला घरी नेले आणि अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, असं अधिकाऱ्याने एफआयआरचा हवाला देत सांगितले.

जीवे मारण्याची दिली धमकी

आरोपीनं लैंगिक अत्याचार केल्यावर मुलाला धमकीही दिली, जर कोणाला सांगितले तर जीवे मारेल, अशी आरोपीनं धमकी दिली, असं पोलिसांनी सांगितलं.

    पालकांना सांगितली आपबिती

    अत्याचार केल्यानं मुलाच्या गुप्तांगात मोठ्या प्रमाणात आग होत होती. त्यामुळे तो रडत घरी परतला आणि त्याने पालकांना त्याच्यासोबत झालेली आपबिती सांगितली, यावेळी पालकांच्या पायाखालची जमीनच हादरली. त्यानंतर पालकांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली.

    गुन्हा दाखल

    या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.