जेएनएन, नागपूर: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (CM Mazi Ladki Bahin yojana) योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक सहाय्य मिळत असताना या योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे राज्य सरकारनेच विधानसभेत मान्य केले आहे. सरकारी आकडेवारीनुसार योजनेत मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थ्यांनी पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले असून, आता सरकार या प्रकरणात वसुलीची प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे.
सरकारची कबुली!
राज्य सरकारने विधानभवनात दिलेल्या माहितीनुसार, 32 कोटी रुपयांचे नुकसान राज्य सरकारला झाले आहे.तब्बल 26 लाख अपात्र महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. आणखी धक्कादायक माहिती म्हणजे 14,297 पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. ही योजना फक्त महिलांसाठी असताना हजारो पुरुषांनी लाभ मिळवणे म्हणजे मोठे प्रशासनिक अपयश असल्याचा निदर्शनात आले आहे. सरकारने मान्य केले की, या प्रकरणात बोगस लाभार्थ्यांनी राज्य शासनाची थेट फसवणूक केली आहे.
गैरव्यवहार कसा झाला?
योजनेसाठी अर्ज करताना आधार क्रमांक, बँक खाते आणि पात्रतेची माहिती तपासण्यासाठी तांत्रिक पडताळणी होती. मात्र काही जिल्ह्यांत डेटा व्हेरिफिकेशनमध्ये गंभीर त्रुटी झाले असल्याचा निदर्शनास आले आहे.अपात्र महिलांनीही अर्ज करून लाभ घेतला अशी माहिती समोर आली आहे. सिस्टममध्ये झालेल्या चुकांमुळे पुरुषांचे अर्जही मंजूर झाले. लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी असलेली तपासणी यंत्रणा तांत्रिक दृष्टीने चुकीची असल्याचे निकष समोर आले आहे.
सरकारने हा सर्व प्रकार डिजिटल सिस्टममधील त्रुटी आणि स्थानिक प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे घडल्याचे नमूद केले आहे.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थांसाठी गुडन्यूज, अजित पवारांनी अधिवेशनात केली मोठी घोषणा
वसुलीची कारवाई सुरू?
- राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की,
- अपात्र लाभार्थ्यांनी घेतलेले पैसे सरकार परत वसूल करणार.
- प्रत्येक जिल्ह्यात विशेष समिती नेमली जाणार.
- चुकीने पैसे मिळालेल्यांना नोटिसा देऊन वसुली केली जाईल.
- संबंधित अधिकाऱ्यांवरही शिस्तभंग कारवाई होणार आहे.
- सिस्टम अपडेट करून भविष्यातील फसवणूक रोखली जाणार आहे.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खूशखबर; नोव्हेंबरच्या हफ्त्याबाबत आली मोठी अपडेट
