जेएनएन, नागपूर. Mandal Yatra : ओबीसी समाजाच्या मतांचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून मंडल यात्रा काढण्यात आली  आहे, यावर फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.

वर्षानुवर्षे ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनी आता अचानक हा समाज ‘आठवण्याचे’ नवे राजकारण सुरू केले आहे. ओबीसी समाजाला केवळ भाषणापुरते आणि मतांसाठी वापरणाऱ्यांना आता त्यांच्या संघटित शक्तीची जाणीव झाली असून, त्यातूनच या यात्रेचा ‘सोंग’ सुरू झाले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

ओबीसी समाजाच्या हक्क, आरक्षण आणि कल्याणाच्या प्रश्नांवर ठोस पावले उचलण्याऐवजी, केवळ दौरे आणि सभा घेऊन राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .

फडणवीस कडून ओबीसी समाजाच्या योगदानाची आणि त्यांच्या विकासासाठी सरकारच्या धोरणांची माहिती दिली होती. मात्र, विरोधकांच्या मते हे पाऊल प्रत्यक्ष विकासापेक्षा निवडणूकपूर्व मत मिळविण्याच्या रणनीतीचा भाग आहे अशी टीकाही मुख्यमंत्री यांनी केली.