जेएनएन, वर्धा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (local body election) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची आज सेवाग्रामच्या चरखागृहात मंथन बैठक (BJP Meeting) आहे. बैठकीत विदर्भातील भाजपचे मंत्री, खासदार, आमदार तसेच वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

वर्ध्यात भाजपाची ताकद वाढली

सेवाग्राममधील बैठक विदर्भात भाजपच्या आगामी स्थानीक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अनेक वर्षापासून वर्ध्याला काँग्रेसचा बालेकिल्ला समजले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांत भाजपने येथे आपली संघटनात्मक ताकद वाढवली आहे. 

बैठकीचे प्रमुख मुद्दे !

भाजपच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनिती तयार केली जाणार आहे. या बैठकीत जिल्हानिहाय आढावा आणि उमेदवारीवर चर्चा केली जाणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आणि संघटनबळ वाढविण्याचे उपाय योजना केले जाणार आहे. मतदारांमध्ये सरकारच्या योजनांचा प्रचार कसा करायचा याचे नियोजन केले जाणार आहे. बैठकीत विरोधकांच्या संभाव्य रणनीतीचा अभ्यास करणार आहे. 

सेवाग्राममध्ये बैठक घेणे ही रणनीतीपुरते मर्यादित नसून गांधी विचारधारेच्या भूमीत भाजपचा अस्तित्व असल्याचा प्रतीकात्मक राजकीय संदेश देणे आहे.