एजन्सी, ठाणे. पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेल येथील एका गृहनिर्माण संकुलातील एका महिलेने तिच्या आठ वर्षांच्या मुलीला 29 व्या मजल्यावरील फ्लॅटवरून ढकलले आणि नंतर आत्महत्या केली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.

मानसिकदृष्ट्या अस्वस्थ

ही घटना बुधवारी सकाळी 8 वाजता पळस्पे येथे घडली, असे अधिकाऱ्याने सांगितले. 37 वर्षीय मैथिली दुआ अशी ओळख पटलेली महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे वृत्त आहे.

तिचा आणि तिच्या मुलीचा जागीच मृत्यू

    तिने तिच्या मुलीला ढकलून ठार केलं आणि नंतर उडी मारली. तिचा आणि तिच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे, असे पनवेल पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

    सोलापुरात दोन मुलासंह आईची आत्महत्या

    दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात एका 30 वर्षीय महिलेने तिच्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेत दोन्ही मुलांसह महिलेचाही बुडून मृत्यू झाला आहे, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. महिलेचे सात आणि दीड वर्षांच्या दोन्ही मुले दिव्यांग असल्याने ती नैराश्यात होती, असे पोलिसांनी सांगितले.