जेएनएन, मुंबई. मुंबईतील वरळी येथे महिला आरक्षण विधेयकाविरोधात झालेल्या आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने महाराष्ट्र मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांशी जोरदार वाद घातला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन होती पवार यांनीही भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले रोहित पवार…
‘नौटंकी करणाऱ्या भाजपाला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं करुन खऱ्या अर्थाने ‘हजारोंसे भारी… एक नारी’ हे सिद्ध केलं..! ही नारी शक्ती खऱ्या अर्थाने वंदनीय आहे. आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसं झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो नारी शक्ती पुढं येऊन भाजपचा मुखवटा पुन्हा टराटराsss फाडतील..!’ असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
नौटंकी करणाऱ्या भाजपाला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं करुन खऱ्या अर्थाने ‘हजारोंसे भारी… एक नारी’ हे सिद्ध केलं..! ही #नारी_शक्ती खऱ्या अर्थाने #वंदनीय आहे. आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसं झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो… pic.twitter.com/qDCAbhzRc3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 22, 2026
नेमकं काय आहे प्रकरण:
महिला विधेयकाच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. महाराष्ट्र सरकारचे मंत्री गिरीश महाजन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना वाहतूक कोंडीमुळे वैतागून ती महिला गाडीतून उतरली आणि थेट आंदोलनाच्या मध्यभागी गेली. तिचा मंत्री आणि कार्यकर्त्यांशी जोरदार वाद झाला. राजकीय सभांमुळे जनतेला होणाऱ्या त्रासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, तिने कठोर भाषा वापरली आणि आंदोलकांवर "इथून चालते व्हा!" असे ओरडत जमावाला पांगण्यास सांगितले. तुमच्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे, असे म्हणताना ती महिला व्हिडिओत दिसत आहे.
VIDEO | Maharashtra: A lady stuck in traffic lost her cool during BJP's protest over Nari Shakti Vandan Adhiniyam on a road of Mumbai earlier today.
— Press Trust of India (@PTI_News) April 21, 2026
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/JaETeVppiT
हेही वाचा - Mumbai Water Supply: मुंबईत 'या' विभागात आज-उद्या पुर्ण पाणीपुवरठा बंद, पाहा तुमच्या भागातील स्थिती
