मुंबई/पुणे Mumbai pune expressway news- राज्यातील सर्वात महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग असलेला मुंबई –पुणे एक्सप्रेसवेवर 23 आणि 24 एप्रिलला मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या दोन दिवसांत दररोज तीन तास संपूर्ण वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. यामुळे पुणे मुंबई महामार्गावर जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा फटका बसणार आहे.
कुठे होणार काम?
डोंगरगाव–कुसगाव परिसरातील पुलाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये शटरिंग काढणे आणि रंगकामाचा समावेश आहे.
किती वेळ बंद?
23 आणि 24 प्रत्येकी दोन्ही दिवस 3 तास पूर्ण वाहतूक बंद राहणार आहे. या काळात एकही वाहन एक्स्प्रेसवेवरून जाऊ शकणार नाही.या कामाचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळकडून करण्यात आले आहे.
दररोज किती वाहतूक?
या मार्गावरून दररोज सुमारे 80 हजारांहून अधिक वाहनांची ये-जा होते. त्यामुळे ब्लॉकदरम्यान मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
पर्यायी मार्ग वापर -
वाहतूक बंद असताना वाहनचालकांनी जुन्या मुंबई–पुणे महामार्गाचा (NH-48) वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वाहनचालकांसाठी सूचना!
* प्रवासाचे नियोजन आधीच करा
* ब्लॉकच्या वेळेत एक्स्प्रेसवे टाळा
* पर्यायी मार्गांचा वापर करा
* वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना काहीसा त्रास होणार असला, तरी पुलाच्या दुरुस्तीमुळे भविष्यातील प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
