जेएनएन, मुंबई. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. दुरुस्ती आणि देखभाल कामांमुळे शहरातील अनेक भागांमध्ये तब्बल 18 तास पाणीपुरवठा खंडित राहणार असून, काही भागात कमी दाबाने पाणी मिळणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जलवाहिन्यांच्या दुरुस्ती, वाल्व बदल आणि इतर तांत्रिक कामांसाठी हा तात्पुरता बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्या भागांवर परिणाम?
शहर आणि उपनगरांतील अनेक विभागांमध्ये पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहील, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येईल. विशेषतः उंच भागांमध्ये पाणीपुरवठा अधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे.
12 प्रभागांत 5% कपात!
बीएमसी प्रशासनाने आयलंड सिटी आणि पूर्व उपनगरांतील 12 पालिका प्रभागांमध्ये 5 टक्के पाणी कपात लागू केली आहे.
पूर्ण पाणीपुरवठा बंद असलेले भाग मुख्यतः दक्षिण मुंबई (South Mumbai) आणि खालील BMC वॉर्डमध्ये परिणाम:
A वॉर्ड
- P. D’Mello Road
- CSMT परिसर
- सेंट जॉर्ज हॉस्पिटल
- RBI परिसर
- नवल डॉकयार्ड
B वॉर्ड
- उमरखाडी
- नूरबाग
- चिंचबंदर
- वाळपाखाडी
- जेल रोड
- डोंगरी, मस्जिद बंदर परिसर (काही ठिकाणी)
इतर प्रभावित भाग
- दाना बंदर
- वाडी बंदर
- मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसर
ज्या भागात कमी दाबाने पाणी
- मोहम्मद अली रोड
- डोंगरी परिसरातील काही भाग
- आसपासचे मध्य-दक्षिण मुंबई भाग
बीएमसीकडून सूचना
- आवश्यक तेवढंच पाणी वापरावे
- पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी
- गळती टाळण्यासाठी नळ बंद ठेवावेत. पालिकेने सांगितले की, कामे पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. मात्र सुरुवातीच्या काही तासांमध्ये पाण्याचा दाब कमी राहू शकतो.
दरम्यान, आधीच पाणीसाठा कमी झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्यातील हा खंड नागरिकांसाठी त्रासदायक ठरणार आहे.
