मुंबई : Ladki Bahin Yojana Update : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० इतकी आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ऑक्टोबर महिना संपत आला तरी पैसे जमा न झाल्याने महिलांमध्ये चिंतेचे कारण आहे. त्यातच आता नवी माहिती समोर आली असून, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राज्यभरातील लाखो लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

कधी मिळणार ऑक्टोबरचा हफ्ता - 

दिवाळीला ऑक्टोबरचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होणार असे सांगितले जात होते, मात्र दिवाळी संपली तरी हफ्ता जमा न झाल्याने महिल्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. ई-केवायसी प्रक्रिया आणि तांत्रिक पडताळणीच्या कामात उशीर झाल्यामुळे निधी वितरण थोडे पुढे ढकलण्यात आले आहे.

ई-केवायसी आणि पडताळणीमुळे विलंब -

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी सरकारने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. अनेक लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नसल्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासन आणि बँकांमध्ये पडताळणी सुरू आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे पैसे थांबले असल्याचे सांगण्यात आले आहे.

    शासनाचे स्पष्टीकरण-

    महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता रद्द करण्यात आलेला नाही. ऑक्टोबरचा हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे उशिरा मिळणार आहे, मात्र सर्व पात्र महिलांना तो नक्कीच मिळेल.