जेएनएन, मुंबई, Maharashtra Weather Update : कोकणात जोरदार पाऊस सुरूच असून विदर्भ, मराठवाड्यातही पावसाची कोसळधार कायम आहे. हवामान विभागाने देशाच्या काही भागांमध्ये पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट -

मागील 48 तासांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबई, कोकणात सतंतधार सुरू असून  पुढील 24 तासासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. मराठावाडा आणि विदर्भाच्या पूर्वेकडील भागातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.  विदर्भातही ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

देशभरातील हवामानाचा अंदाज!

IMD च्या अंदाजानुसार जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश,महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांत संभाव्य पूरस्थिती, झाडांच्या फांद्या तुटणे, विजेच्या तारा तुटणे अशा घटनांचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घेण्याचे घ्यावी असे आवाहन केले आहे.