जेएनएन, मुंबई. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठा बदल करण्यात आला आहे. मागी काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि विधीमंडळात रमी खेळतानाचा कथीत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कृषी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झाल्याची माहिती आहे.

मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी विभागाचा कारभार सोपवण्यात आला आहे. तर माणिकराव कोकाटे यांच्या कडे आता क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे.

कोकाटे वादात

माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक आमदार रोहित पवार यांनी माध्यमांवर शेअर केला होता. त्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू होता. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती. माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती, मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडे असलेलं खातं बदलण्यात आलं आहे.