जेएनएन, मुंबई: सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळलेले राज्याचे दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडणारे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन अजित पवारांच्या आठवणीने जड झाल्याचे पहायला मिळाले.

मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात आणि प्रशासनात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.  

'काम करणारा माणूस' अशा शब्दात अजित पवारांच्या कामाची ओळख मांडतानाच अजित पवारांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अजित पवारांच्या स्मृतींना अर्थसंकल्प समर्पित 

अजित पवारांच्या व्यक्तीमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. तसंच त्यांनी, अजित पवारांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार जाहीर करत देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत अजित पवारांच्या स्मृतींना हा अर्थसंकल्प समर्पित केला.