जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी सोलापूर जिल्हाअध्यक्ष उमेश पाटील यांची तर मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची आज नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेश पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी तर मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

आज देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाचे अन्य नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली अपेक्षा

लोकनेते अजितदादा पवार यांचे विचार, आदर्श आणि जनसेवेचा वारसा पुढे नेत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांनी निष्ठेने व समर्पणाने कार्य करावे, अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेसचे एमएलसी आणि मुंबई अध्यक्ष झीशान सिद्दिकी म्हणतात, "आता खूप आनंद आणि उत्साह आहे कारण सुनेत्रा पवार, पार्थ पवारांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि अजितदादांचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आणि माझे वडील बाबा सिद्दिकीजी यांच्यासोबत या क्षणाची वाट पाहत अनेक लोक आता पक्षात प्रवेश करू इच्छित होते.”