जेएनएन, मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले असून सर्वत्र तपासणी सुरू केली आहे. तर आरोपीचा शोध घेण्यासाठी कॉल डेटा तपासणी सुरू आहे.

माहितीनुसार, आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून मुंबईत स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली. पोलिसांकडे फोन कॉल आल्यानंतर लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. तात्काळ चौकशीला सुरुवात झाली असून पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. 

पोलिसांची कारवाई!

फोन कॉलची लोकेशन व कॉल डिटेल्स शोधण्याचे काम सुरू केले आहे. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

रेल्वे स्थानके, विमानतळ, बाजारपेठा, पर्यटन स्थळे, सरकारी कार्यालये याठिकाणी सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.बॉम्ब शोध पथक (Bomb Squad) आणि डॉग स्क्वॉडला महत्त्वाच्या भागात तैनात करण्यात आले आहे. मुंबईला याआधीही अनेकदा अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. काही वेळा त्या खोट्या निघाल्या असल्या तरी प्रत्येक वेळी पोलिसांनी गांभीर्याने तपास करून आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना केली आहेत. 

नागरिकांना आवाहन

    मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठलीही संशयास्पद वस्तू, हालचाल किंवा व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत करावी.