एजन्सी, ठाणे: ठाणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली (Thane Double Murder) आहे. येथील काही अज्ञात व्यक्तींनी 2 चुलत भावांची भररस्त्यात हत्या केली आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
तलवार आणि चाकूने पीडितांवर वार
भिवंडी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन बर्वे यांनी सांगितले की, सोमवारी रात्री 11.30 वाजता भिवंडी परिसरातील खर्डी गावातील रस्त्यावर हल्लेखोरांनी तलवार आणि चाकूने पीडितांवर वार केले.
त्यांना मृत घोषित केलं
गंभीर जखमी झालेले दोघेही जमिनीवर कोसळले नंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. हल्ल्यामागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही.
खर्डी गावचे रहिवासी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित प्रफुल्ल तांगडी (42) आणि चेतन तांगडी (22) हे खर्डी गावचे रहिवासी होते.मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
गुन्हा दाखल
अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम 103(1) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.