एजन्सी, यवतमाळ: यवतमाळ (Yavatmal Crime News) जिल्ह्यातील एका 9 वर्षीय मुलाने त्याच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दुसऱ्या महिला वर्गमित्राच्या मदतीने शाळेच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.
या प्रकरणणात आरोपी मुलाला आणि गुन्ह्याला प्रोत्साहन देणाऱ्या 9 वर्षांच्या मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, 8 वर्षांची पीडित मुलगी आणि दोघे आरोपी हे बाबुलगाव शहरातील जिल्हा परिषद शाळेत तिसऱ्या वर्गाचे विद्यार्थी आहेत. 1 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती.
पीडितेच्या गुप्तांगांवर जखमा
काही दिवसांपूर्वी, पीडितेने तिच्या गुप्तांगात वेदना होत असल्याची तक्रार केली, त्यानंतर तिच्या आईने तिला रुग्णालयात नेले. रुग्णालयातील डॉक्टरांना पीडितेच्या गुप्तांगांवर जखमा आढळल्या, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
शौचालयात केला अत्याचार
पीडितेच्या आईने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिच्या मुलीने तिला सांगितले की तिच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या मुलीच्या मदतीने शाळेच्या शौचालयात तिच्यावर अत्याचार केला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
गुन्हा दाखल
पीडितेच्या आईने 9 ऑगस्ट रोजी मुलगा आणि मुलीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.
दुसऱ्या एका मुलीने मुलाला केली मदत
यवतमाळचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता म्हणाले की, बाबुलगावमध्ये एका 9 वर्षांच्या मुलाने 8 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली आहे. ते म्हणाले की, 9 वर्षांच्या दुसऱ्या एका मुलीने मुलाला (गुन्ह्यात) मदत केली. दोन्ही आरोपी मुलांना रिमांड होममध्ये पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.