जेएनएन, मुंबई. आगामी 12 ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी विशेष दर्शन आणि सुरक्षाव्यवस्था आखली असून, कॅमेरा व लॅपटॉप मंदिरात नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पहाटे 3.15 वाजता  महापूजा त्यानंतर दिवसभर भजन, आरती व विशेष पूजाविधीचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री 11.50 वाजेपर्यंत दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे 

कॅमेरा आणि लॅपटॉपवर बंदी!

भाविकांची वाढती संख्या आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की कोणताही कॅमेरा, लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण मंदिरात नेण्यास परवानगी नाही. मोबाईलही फक्त गरजेपुरते वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाविकांसाठी सुरक्षा उपाय!

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आले आहेत.वैद्यकीय पथक मंदिराच्या गाभाऱ्याजवळ सतत तैनात आले आहे. 2 रुग्णवाहिका तयार, त्यातील एक कार्डियाक अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे