जेएनएन, मुंबई. Mumbai News: राज्याच्या सत्ताधारी महायुती सरकारविरोधात ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुतीतील मंत्र्यांवर लागलेले गंभीर आरोप आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. येत्या 11 ऑगस्ट रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आंदोलन पार पडणार आहे.
आंदोलनाचे प्रमुख मुद्दे
महायुतीतील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचार, गैरव्यवहार, आणि नैतिकतेला सुरुंग लावणारे आरोप झाले आहे. सरकार त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करत नाही, अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जात आहे.
राजीनाम्यांची मागणी
आंदोलनाद्वारे ठाकरे गटाकडून कंलकित आणि भ्रष्टाचाराने माखलेल्या मंत्र्यांना त्वरित मंत्रिपदावरून हटवावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन
केवळ मुंबईत नव्हे, तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिवसेनेकडून जनआक्रोश आंदोलन उभारण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत.
शिवाजी पार्कवर भव्य मोर्चा
मुंबईतील शिवाजी पार्क हे आंदोलनाचे प्रमुख केंद्र असणार असून, हजारो शिवसैनिक, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक येथे उपस्थित राहणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह, इतर वरिष्ठ नेते आंदोलनाला संबोधित करणार आहे.
हेही वाचा - Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंची सेना आणि राज ठाकरेंची सेनेची अखेर झाली युती! ही निवडणुक सोबत लढवणार