जेएनएन, पालघर. Palghar Rape Case: पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत एका तरुणानं तिच्यावर बलात्कार केला आहे. यातून ती गर्भवती राहिली आहे. या आरोपाखाली पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
दोघं एकमेकांना ओळखत होते
22 वर्षीय आरोपी आणि ती मुलगी हे नालासोपारा भागातील एकाच परिसरातील रहिवासी आहेत. ते दोघे एकमेकांना ओळखत होते. याचाच फायदा घेऊन तरुण तिच्या घरी जात असे.
घरात तरुणी एकटीच
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला आरोपी मुलीच्या घरी गेला होता. यावेळी घरात तरुणी एकटी असल्याचं तिल्या दिसले. अन् त्याने याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे, असे अचोले पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा - Marathi Sahitya Sammelan 2025: प्रेम, संवाद, सहवास, सहनशीलतेमुळे मराठीचा अमराठीशी सुखाने संसार
मुलगी गर्भवती
वैद्यकीय तपासणीदरम्यान, मुलगी सहा आठवड्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले आहे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - 3 मार्चपासून मुंबईत राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, 10 मार्चला सादर होणार अर्थसंकल्प
गुन्हा दाखल
या प्रकाराची माहिती मुलीच्या आईला झाल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर शनिवारी आरोपीला अटक करण्यात आली आणि भारतीय न्याय संहिता कलम 64 (बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Palghar News)