जेएनएन, मुंबई. Mumbai to Nagpur Samruddhi Highway Latest News: मुंबई - नागपूर या दोन मोठ्या शहरांना जोडणारा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. या महामार्गाचा शेवटच्या टप्यातील ठाणे ते इतगापुरीचा मार्ग लवकरच सुरु होणार आहे. 5 जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होणार आहे.

मुंबई ते नागपूर विनाअडथळा प्रवास 5 जूनपासून सुरू होणार आहे. समृद्धी महामार्गात ठाणे ते इगतपुरीचा 76 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली आहे. 

मुंबई ते नागपूर जलद प्रवासासाठी 'एमएसआरडीसी'ने 701 किलोमीटर लांबीच्या महामार्गाची उभारणी केली आहे. 'एमएसआरडीसी'ने आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला केला आहे. ठाणे-इगतपुरीच्या शेवटच्या टप्प्यातील महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते मुंबई आठ तासांत पोहोचता येणार आहे.

समृद्धी महामार्गाचा टप्पा!

नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचा 520 किमीचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये खुला झाला होता.दुसरा टप्पा नागपूर ते भरवीर शिर्डी आणि भरवीर शिर्डी ते इगतपुरीचा तिसरा टप्पा सुरू केला. ठाणे ते इगतपुरी महामार्ग सुरू झाल्याने मुंबई ते नागपूर सुसाट वेगाने पोहचता येणार आहे. 

    7.78 किमीचा राज्यातील सर्वाधिक लांब बोगदा!

    ठाणे ते इगतपरी 76 किलोमीटरच्या डोंगराळ भागात 'समृद्धी'वर पाच बोगदे आहेत. बोगद्याची एकुण  लांबी 11किमी असून,त्यात कसारा ते इगतपुरी 7.78 किमीचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. या बोगद्यामुळे कसारा ते इगतपुरीचा अंतर आठ मिनिटात होणार आहे.