जेएनएन, मुंबई. Corona Cases in Maharashtra On 2 June 2025: महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या रोज वाढत आहे. राज्यात कोरोनाचे 65 नवीन रुग्ण सापडले आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले (Corona Cases in Mumbai) आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 506 वर
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 506 वर पोहोचली (Covid 19 Cases in Maharashtra) आहे. तर मुंबईत सर्वाधिक 22 रुग्ण सापडले आहे. 25 पुण्यातून, नऊ ठाण्यातून, सहा पिंपरी-चिंचवडमधून, दोन कोल्हापूरातून आणि एक नागपूरमधून आढळले आहेत.
मुंबईत 463 रुग्णाची नोंद
आतापर्यंत राज्यात 300 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५०६ आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. जानेवारी महिन्यापासून राज्यात 11501 स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहे. त्यामध्ये 814 जण कोरोना संसर्गजन्य आढळून आले आहे. मुंबईत 463 रुग्णाची नोंद करण्यात आली आहेत. जानेवारी ते आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे एकूण आठ जणांनी प्राण गमावले आहे.
देशात कोरोना रुग्णांची स्थिती (Covid 19 Cases in India)
देशात कोविड 19 चे सक्रिय रुग्ण 4000 वर (Corona Cases in India) पोहोचले आहेत. त्याच वेळी, कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक 47 रुग्ण आढळले आहेत. यासह, दिल्लीत कोविडचे 483 सक्रिय रुग्ण आहेत. त्याच वेळी, देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण केरळमध्ये आहेत, ज्यांची संख्या 1435 आहे.
सतर्क राहण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन!
राज्यात आरोग्य विभागाकडून कोरोनाचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणामध्ये रुग्णांची कोरोनाची चाचणी केली जात आहे. रुग्ण कोविड पॉझिटिव आल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात कोरोनाचे केसेस जास्त नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.