जेएनएन, मुंबई. Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या आहे. रोहित शर्मा राजकारणात सक्रिय होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय नेत्यांशी भेटी
रोहित शर्माने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. रोहित शर्मा यांची सदिच्छा भेट राजकारणात सक्रिय होण्याची चाहूल असल्याचे बोलले जात आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून, या निर्णयाचे अजित पवारांनी स्वागत केले आहे.
रोहित शर्मा उतरणार प्रचारात !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रोहित शर्माने त्यांच्या क्रिकेटमधील खेळाची चर्चा ही केली आहे. रोहित शर्मा यांच्या क्रिकेट मधील अनेक दिवासापासूनची नाराजी राजकीय क्षेत्राकडे घेऊन जात असल्याचे बोलले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत रोहित शर्मा स्टार कॉम्पनेर म्हणून महायुतीचे काम करेल, अशी चर्चा महायुती सुरु आहे. मुंबई महानगरपालिकामध्ये महायुती रोहित शर्मा सारख्या अनुभवी खेळाडूंना घेऊन प्रचार करण्याची योजना आखत असल्याची माहिती नेत्यांनी दिली आहे.
Rohit Sharma: रोहितची वैयक्तिक माहिती
- रोहितचे पूर्ण नाव - रोहित गुरुनाथ शर्मा
- वाढदिवस - 30 एप्रिल 1987
- वय - 38 वर्षे
- जन्म ठिकाण - नागपूर, महाराष्ट्र
- उंची - 5 फूट 9 इंच
- शिक्षण - 12 वी (क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रिझवी कॉलेज सोडले)
- आई-वडील - पूर्णिमा शर्मा / गुरुनाथ शर्मा
- भाऊ - विशाल शर्मा
- गर्लफ्रेंड - सोफिया हयात (रिपोर्टनुसार)
- पत्नी - रितिका सजदेह
- मुले - एक मुलगा - अहान आणि मुलगी - समायरा
हेही वाचा - Navneet Rana Death Threat: माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी! पाकिस्तानमधून आला होता फोन
रोहित शर्माचे क्रिकेट करियर
रोहित शर्माने (Rohit Sharma Career) जून 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आयर्लंडविरुद्ध त्याने पहिला एकदिवसीय सामना खेळला. यानंतर सप्टेंबर 2007 मध्ये त्याने टी-20 पदार्पण केले, पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. आपल्या दुसऱ्या सामन्यात रोहितने पहिल्या डावात षटकार मारत 50 धावा केल्या होत्या.
रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. कसोटी सामन्यांमध्ये त्याने 67 सामने खेळताना 12 शतके आणि 18 अर्धशतकांच्या मदतीने 4301 धावा केल्या आहेत. 273 एकदिवसीय सामने खेळताना रोहितने 11168 धावा केल्या आहेत, ज्यात 32 शतकांचा समावेश आहे. 159 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळताना हिटमॅनने 4231 धावा केल्या आहेत. 2024 टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती घेतली.
किती आहे रोहितची नेटवर्थ?
रोहित शर्माची नेटवर्थ (Rohit Sharma Net Worth in Indian Rupees) अंदाजे 214 कोटी रुपये आहे. त्याला क्रिकेट व्यतिरिक्त ब्रँड एंडोर्समेंट, आयपीएल आणि क्रिकेट सामने खेळण्याचे पैसे मिळतात. याशिवाय त्याला त्याच्या दोन अपार्टमेंटमधून भाडेही मिळते. अंदाजे दरमहा 3 लाख रुपये त्याला त्याच्या अपार्टमेंटमधून भाडे मिळते.
IPL मानधन - 16.30 कोटी रुपये (प्रत्येक हंगाम)
एकदिवसीय सामना फी - 6 लाख रुपये (प्रत्येक सामना)
T20 सामना फी - 3 लाख रुपये (2024 विश्वचषकानंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली)
एकूण IPL कमाई - 174.3 कोटी रुपये
BCCI केंद्रीय करार - ग्रेड A+ - 7 कोटी रुपये