जेएनएन, मुंबई. Eid Ul Fitr 2025: राज्यात सर्वत्र ईद उल-फित्र हा सण मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

सर्वांना ईद उल-फित्रच्या खूप खूप आनंददायी शुभेच्छा! ईद मुबारक! अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

मुस्लिम बांधवांना रमजान ईद या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा… अशा शब्दांत X वर पोस्ट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    हेही वाचा - दोन वर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, 31 मार्चच्या आधी बँकेत पैसे जमा करण्याचा अजित पवारांचा सल्ला

    सामाजिक ऐक्य अधिक दृढ करुया

    यंदाची ईद सर्वांच्या जीवनात आनंद, सौख्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात प्रेम, सौहार्द, एकता आणि बंधुत्व अधिक दृढ होवो. रमजान ईदच्या निमित्तानं वंचित, गरजू बांधवांना मदतीचा हात देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊया. यंदाची ईदही आपण सर्वांनी एकोप्यानं, आनंदानं आणि उत्साहानं साजरी करुया. परस्परांप्रती सहकार्याची भावना वृद्धिंगत करत सामाजिक ऐक्य अधिक दृढ करुया. मानवकल्याण आणि विश्वबंधूत्वाचा संदेश संपूर्ण जगाला देऊया, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

    सध्याच्या काळात समाजात ऐक्य, सहिष्णुता आणि बंधुत्व वृद्धिंगत होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रमजान ईद हा सण समाजात परस्परांबद्दल प्रेम, आपुलकी आणि मदतीची भावना वाढवतो. महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक ऐक्य आणि प्रगतीसाठी ही बंधुत्वाची भावना अत्यंत आवश्यक आहे, असंही अजित पवार म्हणाले.

    हेही वाचा - ‘दिशा सॅलियन तिच्या वडिलांमुळे होती नैराश्यात', मुंबई पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये उघड; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण 

    मुंबईत सर्व धर्माचे लोक प्रेमाने एकत्र राहतात 

    ईद उल-फित्र निमित्त काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. मुंबईत सर्व धर्माचे लोक प्रेमाने एकत्र राहतात आणि सण-उत्सव सौहार्दाने साजरे करतात. सर्व काही सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस अधिकारी उपस्थित आहेत. त्या सर्वांचे स्वागत करण्यात आले आहे, असं ते म्हणाले.

    हेही वाचा - Thane Crime News: रिक्षातून 7 वर्षीय चिमुकल्याचं अपहरण, 2 कोटींची मागणी अन् पोलिसांनी 3 तासांत अवळ्या आरोपीच्या मुसक्या