जेएनएन,मुंबई: महायुतीच सरकार राज्यात स्थापन झाल्यास शेतकारीची कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचार दरम्यान केली होती. महायुती सरकारच पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले मात्र शेतकरी कर्जमाफी झाली नाही. राज्य सरकार कडून अर्थसंकल्प सादर करतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक घोषणा केले आहे मात्र शेतकरीची कर्ज माफीची घोषणा केली नाही.

काय म्हणाले अजित पवार !
विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडले आहे. राज्यात आर्थिक शिस्त गरजेची आहे. त्यानुसार राज्याचा  अर्थसंकल्प सादर केला आहे. विरोधकांनी जी टीका करायची ती केली. आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. सर्व धर्माचे लोक एकत्र राहण्याची ही आपली परंपरा आहे. शिवाजी महाराजांनी शिकवण आपल्याला दिली आहे. त्या शिकवणी मधून आपण पुढे जात आहोत असे अजित पवार यांनी म्हटले. काहींनी निवडणूक आधी कर्जमाफीचे बोलले होते. मी राज्यातल्या जनतेला सांगतो 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा,जे आधी सांगितलं होतं ते प्रत्यक्षात येत नाही. आता कर्जमाफी देण्यासारखी तशी परिस्थिती नाही. यामुळे शेतकरीला कर्जमाफी मिळणार नाही असे अजित पवार स्पष्टच बोलले आहे. आगामी काळात राज्याची आर्थिक  परिस्थिती बघूनच निर्णय घेऊया असे ही पवार यांनी सांगितले आहे. यामुळे राज्यातील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने पुढील दोन वर्ष शेतकरीची कर्जमाफी करता येणार नाही असे अजित पवार यांनी सांगितले आहे. 

काय म्हणाले विरोधक!
विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.मात्र महायुती सरकारने शेतकरीची फसवणूक केली आहे. कर्जमाफी देतो म्हणून शेतकारीचे मते मिळवून घेतली आणि आता कर्जमाफी देत नाही असे बोलत आहे. बळीराजा महायुती सरकारला कधीच माफ करणार नाही. आम्ही शेतकारीच्या कर्जमाफीची लढाई लढतच राहू असे काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:Maharashtra Farmer News: शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज, 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2555 कोटी विमा नुकसान भरपाई