जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update News:  महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये 31 मार्च म्हणजेच आजपासून पुढील चार दिवस म्हणजेच 3 एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस, वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविले आहे. राज्यात जोरदार पाऊस आणि तुफान वादळ सह गारपीटचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.

तुफान वादळाचा तडाखा बसणार

महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागात जोरदार पाऊस आणि तुफान वादळाचा तडाखा बसणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील वातावरणात बदल सुद्धा होत आहे, यामुळे राज्यात कधीही पाऊस पडू शकतो अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

हवामान विभागाचा अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत देशाच्या अनेक भागात हवामानात मोठा बदल होणार आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दक्षिण भारत, पश्चिम आणि मध्य भारतात हवामानात मोठा बदल होणार आहे. तर,  काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट पहायला मिळणार आहे अशी माहीती हवामान विभागाने दिली आहे.

    31 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान वादळ गारपीठ 

    महाराष्ट्रसह कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये 31 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस, वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविले आहे. 2 ते 3 एप्रिल दरम्यान केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविले आहे.

    या राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

    गेल्या 48 तासापासून  पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये जोरदार वारे वाहत आहे. पश्चिम बंगालमध्ये उष्णतेची लाट पहायला मिळाली आहे. 3 एप्रिल दरम्यान पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविले आहे.