जेएनएन, मुंबई. रक्षाबंधन (Raksha Bandhan), गोकुळाष्टमी (Gokulashtami) तसंच वेलंकनी यात्रेसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होणार आहे.

रक्षाबंधन, गोकुळाष्टमी तसंच वेलंकनी यात्रेसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. 

रक्षाबंधन, गोकुळाष्टमीसाठी विशेष गाड्या

रक्षाबंधन तसंच, गोकुळाष्टमीसाठी येत्या 7 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. वांद्रे टर्मिनस ते सांगानेर ही गाडी 7 आणि 14 ऑगस्ट रोजी चालवली जाईल. वांद्रे टर्मिनस ते ओखा या दरम्यान 14 ते 19 ऑगस्ट दरम्यान विशेष गाडी चालवली जाईल. 

वेलंकनी यात्रेसाठी विशेष गाड्या

वेलंकनी यात्रेसाठी 27 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान वांद्रे टर्मिनस ते तमिळनाडूतल्या वेलंकनीपर्यंत विशेष गाड्या चालवल्या जातील. 

    तिकीट बुकिंग तारीख

    या सर्व गाड्यांसाठी तिकीट आरक्षण 3 ऑगस्ट रोजी सुरू होईल. प्रवाशांना आयआरसीटीसी च्या अधिकृत संकेतस्थळावर तसंच संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्रांवर तिकीटांचं आरक्षण करता येईल.