जेएनएन, मुंबई. Maharashtra Politics: महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल, असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. असा प्रश्न संजय राऊतांना पत्रकारांनी केला होता. यावर उत्तर देताना, महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे आणि तो शिंदे गटाच असणार आहे, असा दावा संजय राऊतांनी केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भक्कम

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा भक्कम आहे, काही लोक हे ईडी आणि सीबीआयच्या कारवायांना भिऊन पळून गेले. त्यांची लगाम ही दिल्लीच्या हातात आहे. ते कधीही त्यांना मोकळे करु शकतात, अशी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली. (Sanjay Raut on Eknath Shinde).

हेही वाचा - Republic Day 2025: ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातील फरक तुम्हाला माहित आहे का? प्रजासत्ताक दिनापूर्वी जाणून घ्या त्याचा फरक! 

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांचा त्याग केला, असं शिंदे म्हणाले होते.

    तुम्हाला नैतिक अधिकार नाही

    तसंच,  "तुम्ही 2019 मध्ये फक्त मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा त्याग केला. तुम्ही त्यांची तत्वे सोडून दिलीत, त्यामुळे बाळासाहेब ठाकरे स्मारकाबद्दल बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही." बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी संध्याकाळी वांद्रे कुर्ला संकुलात 'शिवोत्सव' सोहळ्यात शिंदे यांनी हे वक्तव्य केले.