जेएनएन, मुंबई. Pune News: पुणे येथील महात्मा फुले वाडा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde on Mahatma Phule Wada) यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या कामांसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता या स्मारकाच्या विस्तारीकरणाला अधिक गती मिळणार आहे.
हेही वाचा - Santosh Deshmukh Murder प्रकरणात नवा मोड, पोलिसांना सापडला आणखी एक मोबाईल, आरोपी घुलेची पोलिस कोठडी वाढवली
अर्थसंकल्पात 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर
पुणे शहरातील Mahatma Phule Wada व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांच्या विस्तारीकरण करण्यासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे पुनर्वसन या कामांसाठी 200 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला आहे.
हेही वाचा - जीबीएस आजाराच्या महाराष्ट्रात पहिला बळी, पुण्यात मोफत उपचार, आरोग्यमंत्री म्हणाले, चिंता करु नका…
दोन्ही स्मारकांचे जतन आणि विकास
स्मारकांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यानंतर फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन्ही स्मारकांचे जतन आणि विकास करण्यात येणार आहे.
निधी पुणे महापालिकेला वितरीत होणार
प्रशासकीय मान्यतेनंतर मंजूर निधी पुणे महापालिकेला वितरीत केला जाईल. यामुळे स्मारकांच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.